अब्राममुळे प्रत्येयक दिवस सणासारखा- शाहरूख

शाहरूखचा छोटा मुलगा अब्रामच्या येण्याने त्याच्या घरात सध्या आनंदी आनंद वातावरण आहे. त्याचे स्वागत घराच्यानी उत्साहात केले आहे. त्याच्या येण्याने सर्वांना खूपच आनंद झाला असून त्याच्या‍मुळे आम्हा सर्वांसाठी त्याच्यासोबतचा प्रत्येक दिवस हा सणासारखा वाटत असल्याची मा‍हिती अभिनेता शाहरूख खान यानी मिडीयाशी बोलताना दिली.

याबाबत अधिक बोलताना अभिनेता शाहरुख म्हणाला, ‘अब्राम आता आमच्या आयुष्याचा एक भाग असल्याने आम्हा सर्वांना आनंद होत आहे. तो आल्यापासून घरातील आजूबाजूचे वातावरण आनंदी असते. त्यामुळे आम्हा सर्वांसाठी त्याच्यासोबतचा प्रत्येक दिवस हा सणासारखा वाटत असतो. त्याच्या येण्याने आम्ही घरातील सर्वचजण खूप खूष आहोत.’

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत हळहळ व्यक्त केली. जेव्हा मी सचिनच्या निवृत्तीबाबत ऐकले तेव्हा मी ऑस्ट्रेलियात होतो. त्यामुळे मला याबाबत उशिरा माहिती मिळाली. मला फार वाईट वाटले. पण, त्याला खेळाची उत्तम माहिती असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याने क्रिकेटकरिता खूप काही केले आहे. आता, सचिनने आराम करावा आणि कुटुंबासमवेत खूप आनंद लुटावा, असेही शाहरुख यावेळी म्हणाला.

Leave a Comment