दाभोलकर हत्येला दोन माहिने उलटले

पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्याल होवून दोन महिले उलटले तरी, हत्याप्रकरणाच्या तपास अजूनही लागला नाही. दाभोलकर यांच्या हत्येला रविवारी दोन महिने झाले आहेत. तरीही मारेक-यापर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांची १९ पथके मारेक-यांना पकडण्यासाठी कार्यरत आहेत, पण अजून त्यांच्या हाती काही लागलेले नाही.

इतके दिवस या प्रकरणाताचा तपास योग्य दिशेने सुरु आहे, असे सांगणारे पोलिस आता या विषयावर बोलायलाही तयार नाहीत. पोलिसांच्या नेमबाजी स्पर्धेच्या निमित्याने आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी या विषयाच्या प्रश्नाला बगल दिली. इतकेच नाही तर पत्रकारांनी हा प्रश्न विचारल्याबद्दलची नाराजी त्यांच्या बोलण्यात जाणवली.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्र जारी केलं. मात्र तब्बल दोन महिने उलटूनही मारेकरी मोकाट असल्याने जनतेमध्ये संतापाची भावना आहे. पोलिसांची १९ पथकं मारेकऱ्यांना पकडण्यासाठी कार्यरत आहेत, पण अजून त्यांच्या हाती काही लागलेलं नाहीय. विशेष म्हणजे दाभोलकरांच्या हत्येचा तपास करत असताना इतर काही गुन्हातील आरोपींचा शोध पोलिसांना लागला, मात्र दाभोलकरांचे मारेकरी अजूनही हाती लागले नाहीत.