उन्नाव नंतर आदमपूरमध्ये सोन्याची अफवा

फतेहपूर – उत्तर प्रदेशाच्या उन्नाव येथील किल्ल्यामध्ये एक हजार टन सोने पुरून ठेवले असल्याच्या अङ्गवेवरून सरकारने तिथे उत्खनन सुरू केले. त्यामुळे सार्‍या जगात चर्चा सुरू झाली असतानाच आता उत्तर प्रदेशातल्याच आदमपूरमध्ये असेच पुरून ठेवलेले सोने असल्याच्या अङ्गवा पसरल्या असून पुरलेले सोने बघण्यासाठी धावणार्‍या लोकांच्या झुंडी आता आदमपूरकडे पळायला लागल्या आहेत.

आदमपूरजवळील गंगाघाटावरच्या एका महादेवाच्या मंदिरात पुरून ठेवलेले प्रचंड सोने असल्याची अङ्गवा पसरली. उन्नावच्या किल्ल्यात सोने असलेले साक्षात्कार झालेले शोभन सरकार हे साधूच आदमपूरमध्ये सोने असल्याचे सांगत आहेत. त्यांनी तसे सांगितल्याची अङ्गवा पसरताच एकच खळबळ उडाली. या मंदिराचे पुजारी स्वामी मोहनदास हे आपल्या मंदिरात बसले असताना काही लोक मंदिरात घुसले आणि त्यांनी मोहनदास यांच्या डोक्याला पिस्तुल लावून त्यांना एका जागी खिळवून ठेवले आणि मंदिराच्या परिसरात एक बोअर मारून खाली सोने आहे का, याचा शोध घेतला.

गमतीचा भाग म्हणजे या गोष्टीमुळे जागे झालेल्या गावकर्‍यांनी पोलिसात तक्रार केली आणि मंदिरात घुसखोरी केलेल्या लोकांनी बोअर मारून काही सोने नेले सुद्धा आहे असे सांगितले. पोलीस आता तपास करत आहेत. लोकांनी मात्र उन्नावच्या किल्ल्याप्रमाणेच आदमपूरच्या मंदिरात उत्खनन सुरू करावे अशी मागणी केली आहे.