‘क्लोज ऑफ प्ले’ या पुस्ताकातून रिकी पाँटिंगने हरभजनसिंगशी संबंधित २००८ च्या ‘मंकीगेट’ प्रकरणात सचिन तेंडुलकरवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सचिनने ग्वाही देताना हरभजनला खोटी मदत का केली? याचे पाँटिंगला आश्चर्य वाटते. पाँटिंग बहुदा विसरला की, तपासणीत सचिनने दिलेल्या माहितीला खरे मानण्यात आले होते. त्यामुळे रिकीने केलेल्या आरोपात करहीच तथ्य नाही. केवळ नैराश्यातून अथवा प्रसिध्दीच्या हाव्यासापोटी त्यांने असे आरोप केले असावेत असे मत क्रिकेटमधील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. बहुदा पाँटिंगला हे पचायला तयार नाही. यामुळे पाँटिंग जुने मुडदे बाहेर काढत आहे. पुस्तक पाँटिंगचे आत्मचरित्र आहे. यात मंकीगेटशी संबंधित सचिन, हरभजन आणि अनिल कुंबळेचा उल्लेख आहे. हे आरोप लावून पाँटिंगला काय सिद्ध करायचे आहे, हे समजण्यापलीकडचे आहे. खोटे आरोप करून तो स्वत:ला आणि चाहत्यांना धोका देत नाही का? असा सवाल ही क्रिकेटमधील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आयपीएलच्या गेल्या सत्रात पाँटिंग सचिन, हरभजनसोबत मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. त्या संघाच्या व्यवस्थापकांत अनिल कुंबळेचा समावेश होता. एवढे झाल्यानंतरसुद्धा पाँटिंगने प्रकाशनाची अशी नीती स्वीकारली की, ज्यामुळे पुस्तकाची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. येत्याश काही दिवसांत अनिल कुंबळेच्या पुस्तकाची प्रतीक्षा केली पाहिजे. तसे बघितले तर सचिनसुद्धा आत्मकथा लिहिण्याच्या योजनेवर काम करीत आहे. कुंबळे आणि सचिन पाँटिंगच्या दाव्याला कशा प्रकारे फेटाळून लावतात, हे आगामी काळात पाहणे औचित्याचे ठरेल.