हिरेजडीत मर्सिडीजला स्पर्श करण्यासाठी ६० हजार रूपये

दुबई – सौदी राजकुमार आणि राजे अब्दुल्ला यांचा पुतण्या अलवलिद बिन तलाल हा महागड्या वस्तूंचा अति शौकीन आहे व त्यातही त्याला तर्हुतर्हेबच्या गाड्यांचे तर वेडच आहे. अर्थात अब्जावधी डॉलर्सची मिळकत असलेल्या या राजकुमाराकडे डझनावारी महागड्या गाड्या आहेत यात नवल नाही. मात्र इतक्या सगळ्या गाड्यातही सध्या त्याची खास मर्सिडीज विशेष चर्चेत आहे.

ही कन्व्हर्टबल मर्सिडीज अथपासून इथिपर्यंत म्हणजे पुढेपासून मागपर्यंत चक्क महागड्या हिर्‍यांनी सजविली गेली आहे. गाडीची किमत त्यामुळे ३२ कोटींवर आहे. सर्वसामान्यांना अशी गाडी नुसती पहायला मिळणेही अशक्य. पण या गाडीला जर कुणाला स्पर्श करायचा असेल तर त्याची परवानगी राजकुमारांनी दिली आहे. अर्थात त्यासाठी १००० डॉलर्स म्हणजे ६५ हजार रूपये मोजावे लागतात.विशेष नवल म्हणजे या गाडीला स्पर्श करण्यासाठी सौदीत नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. आता बोला!

मात्र हा सौदी राजकुमार अतिशय दिलदार असल्याचे सांगितले जाते. कोणतीही नवी गाडी विकत घेतली की तशीच दुसरी गाडी तो आपल्या सुरक्षा रक्षकांसाठीही विकत घेतो. त्यामुळे राजकुमाराच्या संग्रहात महागड्या गाड्या आणि त्यांच्या जुळ्या गाड्या असा ताफा तयार झाला आहे.

Leave a Comment