भारताच्या आपत्ती व्यवस्थापनाचे जागतिक बँकेकडून स्तुती

वॉशिंग्टन – फायलिन वादळात केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल जागतिक बँकेने भारताची स्तुती केली आहे. फायलिन वादळ धडकण्यापूर्वीच खबरदारी म्हणून ओडिसा आणि आंध्र प्रदेशातील सुमारे 10 लाख नागरीकांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले.

फायलिन चक्रीवादळाचा मोठा तडाखा ओडिसा आणि आंध्रमधील सागरी किनार पट्टीला बसणार होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कता दाखवत नागरीकांना तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले. त्यामुळेच फायलिन वादळानंतरही जिवीतहानी झाली नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यतप्तरतेमुळे 10 लाख नागरीकांचे प्राण वाचविण्यात भारताला यश आले. ही साधी बाब नसल्याचे सांगत भारताने केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाचे जागतिक बँकेने कौतुक केले आहे.