मोहाली- टीम इंडियाच्या फलंदाजांने दुस-या वनडेमध्ये ऑस्ट्रेतलियन गोलंदाजीची कत्तल केली होती. शनिवारच्या तिस-या वनडे सामन्यात मात्र कांगारु टीम इंडियावर वरचढ झालेले दिसत आहेत. भारताचे दोन्ही सलामीचे चार फलंदाज झटपट बाद झाले आहेत. त्याटनंतर धवन, रैना व युवराज बाद झाल्यायने टीम इंडिया अडचणीत आली आहे. शेवटचे बातमी हाती आली तेंव्हा टीम इंडियाने १३ षटकात चार बाद ७६ धावा केल्याा होत्याय.
ऑस्ट्रेरलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.शेन वॉटसनने जयपूर येथील सामन्याातील शतकवीर रोहित शर्माला ११ धावांवर बाद केले.कांगारुंनी धवनला बाद करुन भारताला पहिला धक्काा दिला. सलामीवीर शिखर धवन केवळ ८ धावा काढून बाद झाला. क्लिंट मकायने त्यालला बाद केले. मकायच्या षटकात धवनने दोन चौकार ठोकले होते. परंतु, पुढच्याच चेंडूवर धवन बाद झाला.
त्यानंतर मिचेल जॉन्सनने रैना व युवराजला एकाच षटकात बाद करून टीम इंडियाला अडचणीत आणले आहे. सध्या मैदानात धोनी व विराट कोहली खेळत आहेत. विराटने एक बाजू लावून धरताना ३२ धावा केल्या आहेत. शेवटचे बातमी हाती आली तेंव्हा टीम इंडियाने १३ षटकात चार बाद ७६ धावा केल्या होत्या.