छत्तीसगढ निवडणूक प्रक्रिया सुरू

नोव्हेंबरच्या ११ व १९ या दोन टप्प्यात छत्तीसगढ मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतील  पहिल्या टप्प्याची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारपासून येथे सुरू झाली आहे. राज्यपाल शेखर दत्त यांनी त्यासाठीचे आदेश दिले आहेत. छत्तीसगढ मध्ये दोन टप्प्यात विधानसभा मतदान होणार आहे. पैकी पहिल्या टप्प्यात बस्तरसह अनेक नक्षलग्रस्त जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे ११ व १८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून  उर्वरित ७२ जिल्ह्यासाठी दुसर्या. टप्प्यातील मतदान १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

निवडणूक आयोगाचे आयुक्त व्ही संपथ आणि आयुक्त एस.एस.ब्रह्मा यांच्यासह अनेक वरीष्ठ निवडणूक आयोग अधिकारी शुक्रवारी रायपूर येथे दाखल झाले आहेत. ते राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी आले असून राजकीय नेत्यांबरोबर एक बैठकही घेतली जात असल्याचे सांगितले गेले आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी मतदार आणि निवडणूक अधिकारी यांच्यासाठी सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आले आहेत. छत्तीसगढ राज्यात१,६७,९६,१७४ मतदार असून २१४१८ मतदान केंद्रे आहेत. विधानसभेच्या ९० जागांसाठी येथे मतदान होत आहे पैकी १० जागा मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत तर २९ जागा अनुसुचित वर्गासाठी राखीव आहेत.

पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २५ आक्टोबर असून अर्ज तपासणी २६ आक्टोबरला होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २८ आक्टोबर आहे. तर दुसर्यार टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख १ नोव्हेंबर असून ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.

Leave a Comment