
जम्मू- जम्मू-काश्मीरमधील भारतीय चौक्यांवर आणि नागरी वस्तीवर पाकिस्तान लष्कराने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील साबा जिल्ह्यातील चौक्यांवर आणि नागरी वस्तीवर गोळीबार केला. गेल्या 24 तासांमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून गुरुवारीही नागरी वस्तीमध्ये गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात तीन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले होते. पाकिस्तानकडून सततच्या होणा-या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे 22 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष सीमा भागाला भेट देणार आहेत.