नक्षलवाद्यांचे पुनर्वसन

महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री नक्षलवाद्यांनी घडवलेल्या एका भूसुरुंगाच्या स्ङ्गोटामुळे नक्षलवादविरोधी दलाचे तीन जवान धारातीर्थी पडले. या परिसरात केवळ चकमकीच चालू आहेत असा समज त्यामुळे होऊ शकतो परंतु प्रत्यक्षात या भागामध्ये पोलिसांनी नक्षलवादी झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना भेटून त्यांना पटवून अशा तरुणांना सामान्य जीवन जगण्यास प्रवृत्त करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. ती मोठ्या कल्पकतेने राबवली जात आहे आणि तिला प्रतिसादसुध्दा मिळत आहे. अन्यथा अन्य ठिकाणी होणार्‍या पुनर्वसन योजनांमध्ये प्रत्यक्षात पुनर्वसनासाठी ङ्गार कमी पैसा दिला जातो. परंतु नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने ङ्गार मोठ्या रकमा देऊ केलेल्या आहेत. त्या पदरात पाडून घेऊन शांततेने जीवन जगावे आणि हे जंगलातले जनावरांचे जीणे सोडून द्यावे असे खरोखरच काही तरुणांना वाटायला लागले आहे. मात्र गोळीबाराच्या आणि मरणाच्या बातम्या समोर आल्या की पुनर्वसनाच्या या यशाकडे दुर्लक्ष होते. चकमकीमध्ये काही जवान कामी आले की पोलीस अधिकार्‍यांना टीकेचे लक्ष्य केले जाते. परंतु अतीशय चाणाक्षपणे पुनर्वसन योजना राबवणार्‍या पोलिसांच्या पाठीवर कोणीही कौतुकाची थाप टाकत नाही. तशी टाकण्याची वेळ आली आहे.

धानोरा तालुक्याच्या बडाझोरी या गावात नक्षलविरोधी मोहिमेवर असलेल्या पोलीस दलाच्या मुक्कामाच्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्ङ्गोट घडवून आणला. या स्ङ्गोटात नक्षलविरोधी दलाचे नव्याने सेवेत रुजू झालेले तीन जवान शहीद झाले. या भागात गेल्या काही दिवसांपासून या नक्षलविरोधी दलाची शोधमोहिम सुरू आहे. या मोहिमेवरील जवान एका जिल्हा परिषद शाळेमध्ये रात्री मुक्कामाला होते. ते जंगलामध्ये ङ्गिरून रात्री ११.३० वाजता या शाळेत आले. मात्र दरम्यानच्या काळात नक्षलवाद्यांनी त्यांना हुलकावणी देऊन जवळच्या एका गटारातून चर खोदून बरोबर शाळेच्या खोलीच्या खालच्या बाजूला सुरुंग पेरला होता. पोलीस मुक्कामाला येताच नक्षलवाद्यांनी ह्या सुरुंगाचा स्ङ्गोट घडविला. त्यात तीन जवान मृत्युमुखी पडले. खरे म्हणजे नक्षलवाद विरोधी दलाची मुक्कामाल राहण्याची पध्दत आहे. रात्री मुक्कामाल जाण्याच्या आधी त्या जागेत सुरुंग पेरून ठेवलेला आहे काय याची तपासणी केली जाते. मात्र यावेळी तपासणीची दक्षता घेतली गेली नाही. शेवटी ती महागात पडली. मात्र नक्षलवादविरोधी दलाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार याच परिसरामध्ये झडलेल्या चकमकीत तीन नक्षलवादीसुध्दा ठार झाले आहेत. दाट जंगलामध्ये जवानांना हे यश मिळाले.

जंगलात शोध मोहीम सुरू असताना एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्यावरून माग काढला असता त्याच परिसरामध्ये नक्षलवाद्यांचे लपण्याचे ठिकाण असल्याचे त्यांना दिसून आले आणि पुढे जाईपर्यंत अशाच दोन नक्षलवाद्यांचे काही अवशेष आणि सामान आढळले. हा शोध चालू असताना जवळपास नक्षलवाद्यांचा अड्डा असूनही त्यांनी जवानांना प्रतिकार केला नाही. कारण ते तिथून पळून गेलेले होते. एकंदरीत छुप्या पध्दतीने त्यांनी एक स्ङ्गोट घडवून तीन जवानांचे प्राण घेतले असले तरी या भागातून त्यांना माघार घ्यावी लागली आहे. ही गोष्ट एका परीने आनंदाची आहे. २०१२ साली पोलीस तसेच राखीव पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झडलेल्या चकमकींमध्ये पोलिसांच्या बाजूने जास्त मनुष्यहानी झाली होती. परंतु २०१३ साल हे बाजू पलटवणारे ठरले आहे. यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये २३ नक्षलवादी मारले गेले आहेत. म्हणून नक्षलवाद्यांचा या भागातला सुळसुळाट थोडा कमी झाला आहे आणि नव्याने रूजू झालेल्या विशेष प्रशिक्षण दिलेल्या नक्षलवाद विरोधी दलामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींना आणि आक्रमकतेला बराच पायबंद बसला आहे.

गडचिरोलीमध्ये ही सारी चकमक जारी असताना बिहारमध्ये मात्र एका भूसुरुंगाच्या स्ङ्गोटाद्वारे तिथल्या माओवाद्यांनी सात जवानांचे प्राण घेतले. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या या स्ङ्गोटामध्ये एक सरकारी वाहन उडवून देण्यात आले. त्या वाहनात जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि त्यांचे पती प्रवास करीत होते. बिहारचे विभाजन झाल्यापासून बिहार हे राज्य माओवादी चळवळीपासून मुक्त झाले होते. कारण संयुक्त बिहारच्या झारखंड भागामध्ये नक्षलवाद्यांचा जोर होता. २००३ साली झारखंडाची निर्मिती झाल्यापासून बिहारमधला नक्षलवाद्यांचा उपद्रव थांबला होता. परंतु तो काल पुन्हा एकदा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उद्भवला. बिहार हे राज्य संयुक्त असतानाच औरंगाबाद आणि गया या दोन जिल्ह्यात माओवाद्याचा उपद्रव होता आणि तो गेली पाच वर्षे शांत होता. परंतु तो पुन्हा एकदा उद्भवला आहे. एकंदरीत ओरिसा, छत्तीसगढ, झारखंड ही नक्षलवादग्रस्त राज्ये तुलनेने शांत असून अनपेक्षित ठिकाणीच नक्षलवाद्यांचा उपद्रव वाढताना दिसत आहे. ही चिंतेची बाब होय. नक्षलवाद विरोधी मोहिमेत पूर्ण यश कधी मिळेल असा प्रश्‍न काही वेळेला मनात येतो मात्र तसे यश आंध्र प्रदेशात मिळालेले आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधावेसे वाटते. कधी ना कधी महाराष्ट्रातही नक्षलवादी संपतील.