भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

जयपूर – जयपूर येथे खेळल्या जाणार्‍या क्रिकेट सामन्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात आज (बुधवार) भारताने 9 गडी आणि 39 चेंडू शिल्लक राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. भारताला विराट कोहली, रोहीत शर्मा यांच्या धडाकेबाज शतकीखेळीने ऑस्ट्रेलियाने दिलेले 359 धावांचे लक्ष्य सहज पार करणे शक्य झाले.

या विजयाबरोबरच टीम इंडियाने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात आपल्यया शानदार खेळीने 95 धावा करून शिखर धवनने टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. टीम इंडियाचा फलंदाज रोहित शर्माने या सामन्यात शानदार शतक ठोकत संघाच्या विजयासाठी मोलाची कामगिरी बजावली. रोहितचे एकदिवसीय कारकिर्दीत हे तिसरे शानदान शतक आहे.

रोहित या सामन्यात 102 चेंडूत हे शतक पूर्ण केले असून त्यात 11 चौकार आणि 3 छटकारांचा समावेश आहे. शिखर धवन बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने मैदानात सर्वत्र फटकेबाजी करत आपले दणदणीत शतक ठोकले. विराटने हे शतक अवघ्या 52 चेंडूत पुर्म केले. टीम इंडियाला जोरदार सुरुवात करून देणार्‍या शिखर धवनचे अवघ्या पाच धावांनी शतक हुकले. धवनचा बळी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेम्स फॉक्नर याने घेतला असून धवनने 86 चेंडूत 14 चौकारच्या मदतीने 95 धावा पूर्ण केल्या.

Leave a Comment