कडूलिंबाचे उपयोग

कडूलिंब हा वृक्ष अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म धारण करणारा म्हणून ओळखला जातो. हे खरे असले तरी कोणत्या विकारावर कडूलिंबाचा कसा वापर करावा, याचे ज्ञान नसल्यामुळे आपल्या आसपास अनेक झाडे असूनही आपण विविध विकारांवर त्याचा वापर करत नाही. अशा प्रकारचा वृक्ष सोडून देऊन आपण शरीरात विष निर्माण करणारी इतर औषधे वापरत बसतो. लिंबाचे इतर अनेक उपयोग बघण्यासाठी त्वचेच्या सौंदर्यासाठी काय उपयोग होतात हे बघणे मनोरंजक ठरणार आहे. शरीराच्या सौंदर्यामधला कडूलिंबाचा सर्वात मोठा वापर म्हणजे सौंदर्यपिटीका कमी करणे. तरुण मुला-मुलींमध्ये हा त्रास जाणवतो. त्यावर अनेक प्रकारची औषधे वापरली जातात.

काही वेळा तारुण्यपिटिका ङ्गुटून चेहरा काळा पडतो. अशा अडचणींवर कडूलिंबांचा उपयोग होतो. कडूलिंबाची काही पाने गोळा करावीत आणि ती पाण्यात टाकावीत. पाणी गरम करावे. प्रदीर्घकाळ पाणी गरम केल्यास लिंबाच्या पानांचा हिरवेपणा कमी होतो. म्हणजेच पानांचा अर्क पाण्यात उतरलेला असतो. या पाण्याने चेहरा धुवावा. मुरुम कमी होतात. हेच असे उकळलेले पाणी स्नानाच्या पाण्यात मिसळावे किंवा बाथटबमध्ये टाकावे. त्याचा वेगळा उपयोग त्वचेला होतो. लिंबू, चंदन, हळद यांचा वापर चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी होतो किंवा त्वचेच्या तुकतुकीतपणासाठी होतो.

तसा कडूलिंबाचा वापर होत नाही. कडूलिंबामुळे शरीराला त्रस्त करणारे काही संसर्ग कमी होतात. म्हणजे कडूलिंब आपल्या त्वचेवरची इन्ङ्गेक्शन्स् कमी करतो आणि परिणामी इन्ङ्गेक्शन्मुळे होणारे त्रास वाचतात. आपल्या शरीरावर पडणार्‍या सुरकुत्या किंवा पांढरे छोटे डाग हे आपल्या शरीरातल्या काही प्रक्रियांमुळे पडत असतात. ही प्रकिया कडूलिंबाच्या पानाच्या या पाण्यामुळे मंदावते आणि वृद्धत्वामुळे शरीरावर पडू पाहणार्‍या सुरकुत्या टळतात. कडूलिंबाचा पाला वाटून त्याचा रस गुलाब पाण्यात मिसळून तयार होणारे मिश्रण चेहर्‍याला लावल्यास चेहर्‍याचा तेलकटपणा कमी होतो.

काही लोकांची त्वचा कोरडी असते. तिच्यावर कडूलिंबाचा उपयोग होतो. कडूलिंबाची पाने, त्याचा रस ही औषधी म्हणून वापरावी लागतात. ते सौंदर्यप्रसाधन नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. कडूलिंबाच्या पानांची पावडर वापरून तयार केले जाणारे शांपूसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment