अमेरिका शटडाऊन’ संकटातून सुटली

वॉशिंग्टन – गेले दोन आठवडे अमेरिकन अर्थसत्तेवर आलेले आर्थिक संकट दूर झाले आहे. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटीक पक्षात एकमत झाले असून कर्जाची मर्यादा वाढवण्यास सिनेट सदस्य राजी झाले आहेत. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच ओढवलेल्या आर्थिक संकटातून अमेरिकेची सुटका झाली आहे.

कर्ज फेडण्याची 17 ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकात एकमत होत नसल्यामुळं अमेरिकेवरचं आर्थिक संकट गडद होत चालले होते. त्यामुळे अमेरिकेवर दिवाळखोरीचे संकट ओढवणार होते. अखेरीस हे संकट टळले आहे.

कर्ज घेण्याचे अधिकार असलेले मंडळ 17 ऑक्टोबरला बरखास्त होणार होते. प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे आता या मंडळाची मुदत 7 फेब्रुवारी 2014 पर्यंत असणार आहे. अमेरिकी काँग्रेसमध्ये काल या विषयावर वादळी चर्चा झाली. अखेरीस मुदत संपायला चार तास बाकी असताना 81 विरूद्ध 18 या फरकानं विधेयक मान्य झालाय. यामुळं गेले 16 दिवस अमेरिकेत असलेलं शटडाऊन आता सुरू झालंय. लोकप्रतिनिधी गृहात हे विधेयक मान्य झाल्यावर लगेच यावर स्वाक्षरी केली जाईल अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.