पाकिस्तानातील हिंसाचारात मंत्री ठार

क्वेट्टा – पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा या परगण्यातील डेरा इस्माईल खान या शहरामध्ये झालेल्या एका मानवी बॉम्बच्या हल्ल्यात या परगण्याचे कायदा आणि विधिमंडळ कामकाज मंत्री इस्रारउल्ला खान गंदापूर हे ठार झाले. श्री. गंदापूर हे आपल्या घरासमोर बकरी ईदच्या निमित्ताने जमलेल्या लोकांसमोर बोलत असतानाच शरीराभोवती स्ङ्गोटके गुंडाळलेल्या एका व्यक्तीने या गर्दीत घुसून या स्ङ्गोटकांचा स्ङ्गोट घडवला. त्यात मंत्र्यासह आठ जण ठार झाले.

ही घटना घडली तेव्हा सुमारे पाचशे लोक हजर होते. त्यातले २० जण जखमी झाले. या मानवी बॉम्बने कुलाची भागातल्या या घरामध्ये प्रवेश करताना सुरक्षा सैनिकांनी त्यांना अडवले. परंतु त्यांनी सुरक्षा जवानांना ठार करून या भागात प्रवेश मिळवला आणि बकरी ईदच्या आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या जमावात प्रवेश करून स्ङ्गोट घडवला.

ही घटना घडताच पोलिसांनी या घराला वेढा घातला आणि जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल केले. इस्रारउल्ला खान हे २०१३ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतून अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. पाकिस्तानच्या या दहशतवादग्रस्त प्रांतामध्ये पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू इम्रान खान याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीके इन्साङ्ग या पक्षाचे आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. इस्रारउल्ला खान हे या मंत्रिमंडळात होते.

या भागात सातत्याने हिंसाचार होत असतो. यापूर्वी या प्रांताच्या एका मंत्र्याचा अशाच हिंसक घटनेत मृत्यू झालेला आहे. इम्रान खान याच्यावर सुद्धा एकदा हल्ला झालेला आहे. या हिंसाचाराच्या सत्रात काल आणखी एका मंत्र्याचा बळी पडला.