स्विस बँका भारताला देणार काळा पैसा मालकांची माहिती

जिनिव्हा – गेली काही वर्षे भारत सरकारकडून स्विस बँकांत भारतीयांची ठेवलेल्या काळ्या पैशांसंबंधीची माहिती दिली जावी यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्याला आता स्विस बँकांकडून अनुकुल प्रतिसाद आला आहे. स्विस बँकांनी या संबंधात भारत सरकार जी माहिती मागवेल ती त्वरीत पुरविण्यास मंजुरी दिली आहेच पण या काळ्या पैशांच्या कर वसुलीसाठीही या बँका सहकार्य करणार आहेत.

स्विस बँकांतून गोपनीयता बाळगली जात असल्याने या बँकात काळा पैसा ठेवण्यात केवळ भारतीयच नाही तर जगभरातील नागरिक आघाडीवर आहेत. मात्र पॅरिस येथील ऑरगनायझेशन फॉर इकॉनॉमिक को ऑपरेशन अॅन्ड डेव्हलपमेंट या जागतिक करदाता मानके आणि आंतरराष्ट्रीय नीती ठरविणार्याै प्रमुख संघटनेने या संदर्भात स्विस बँकांवर आंतरराष्ट्रीय दबाव आणला होता. या दबावामुळे स्विसने करविषयक प्रशासकीय सहयोगासाठी वरील संस्थेने केलेल्या समझोता करारावर हस्ताक्षर केले आहे आणि त्याचा फायदा भारताला मिळू शकणार आहे असे समजते.

अर्थात या बँका आपणहून ही माहिती देणार नाहीत तर संबंधित देशाच्या सरकारने ती माहिती मागितली तरच ती पुरविली जाणार आहे.

Leave a Comment