साहित्य संमेलन अध्यक्षपदी फ. मुं. शिंदे

पुणे- सासवड येथे होणा-या 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांची निवड झाली आहे. त्यांनी प्रभा गणोरकर यांचा पराभव केला. शिंदे 460 मते मिळवून अध्यक्षपदी निवडून आले. एरवी साहित्य संमेलनाची निवडणूक सर्वांचं लक्ष वेधून घेते. यंदा मात्र कोणतंही वलय नसलेल्या या निवडणुकीत फमुंनी प्रभा गणोरकर यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीसाठी 4 उमेदवार रिंगणात होते.

या निवडणुकीत एकूण 904 मतं पडली. यातली 14 मतं अवैध ठरली. फ मुं शिंदे यांना 460 मतं मिळाली. साहित्यिका प्रभा गणोरकर यांना 331 मतं मिळाली. अन्य दोन उमेदवार अरूण गोडबोले आणि संजय सोनावणी यांना अनुक्रमे 60 आणि 39 मतांवर समाधान मानावं लागलं.

दरवर्षी अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद रंगतात. यावेळी मात्र असे वाद न रंगल्यामुळे निवडणुकीचा फारसा धुरळा रंगलाच नाही. शिंदे यांची 2009मध्ये मराठवाडा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. महाराष्ट्र सरकारच्या केशवसूत पुरस्काराने त्यांना तीन वेळा सन्मानित केले आहे.

Leave a Comment