योगामुळे आरोग्य लाभ

योगोपचारामुळे शरीराला नेमके काय ङ्गायदे होतात याबाबत दोन टोकाची मते मांडली जात असतात. काही लोकांच्या मते योग हा कोणत्याही रोगावरचा रामबाण इलाज आहे. मात्र काही लोकांना हे मान्य नाही. त्यांच्या मते योग हा शरीराला उपयोगी पडणारा एक व्यायाम आहे. अशी टोकाची मते ऐकली की, नेमके सत्य काय? याविषयी आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. पण सत्य या दोन्हींच्या मध्ये आहे. योगासने, प्राणायाम आणि ध्यान हे काही निव्वळ शारीरिक व्यायाम नाहीत. शारीरिक व्यायाम जीममध्ये दिले जात असतात. ज्यामध्ये शरीराला व्यायाम मिळतो, पण या व्यायामात मनाचा विचार केलेला नसतो.

योगात मात्र शरीराबरोबरच मनाचाही विचार केला जातो. त्यामुळे शरीर तर स्वस्थ होतेच, पण मन सुद्धा शांत होते आणि मन:शांतीचा उपयोग शरीराच्या अन्य विकारांना सुद्धा होतो. तेव्हा योगाविषयीचे हे सत्य जाणून घेतले पाहिजे आणि योगासने करताना मनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह, पचनसंस्था आणि श्‍वसनसंस्था यांच्या आरोग्यात वाढ होत असते. श्‍वसन आणि पचन या दोन यंत्रणा योगाने दुरुस्त होत असल्यामुळे या यंत्रणातल्या दोषातून निर्माण होणारे विकार योगाने दुरुस्त होतात. दमा हा विकार श्‍वासातल्या दोषातून निर्माण झालेला असतो. त्यामुळे योगोपचाराने दम्याचा त्रास कमी होतो.

विशेषत: दम्याचा मोठा अटॅक येण्याचा प्रसंग टळतो. दम्यासाठी योगोपचाराचा वापर करताना दीर्घ श्‍वसन आवश्यक असते, ज्यातून शरीराला जास्त प्राणवायू मिळतो आणि तो मिळाला की, श्‍वासाची गती निरोगी राहते. तसाच उपयोग पचनसंस्थेलाही होतो. सध्याच्या तणातणीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना डोकेदुखी किंवा मायग्रेन या विकारांचा त्रास ङ्गार होत असतो. परंतु दीर्घ श्‍वसन केले म्हणजे मेंदूला होणार्‍या रक्त पुरवठ्यातून ताजा प्राणवायू मोठ्या प्रमाणावर मिळतो आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. सूर्यनमस्कार हा सुद्धा एक योगाचाच प्रकार आहे.

सूर्यनमस्कारात श्‍वासावर लक्ष केंद्रित केले जाते आणि एक ते दहा या क्रमाने दहा प्रकारची योगासने केले जातात. अशा प्रकारे बारा सूर्यनमस्कार घातले की, ही दहा योगासने बारा वेळा घातली जातात आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम मोठाच ङ्गायदेशीर असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment