पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं- माजी कोळसा सचिव

नवी दिल्ली- कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीख यांनी सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचे सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावे कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केली आहे, अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केली आहे.

सीबीआयने काल कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी काल पी.सी. पारीख यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे. भाजप नेते यशवंत सिन्हां यानी पी. सी. पारीख यांच्या वक्तव्याला दुजोरा देत सीबीआय धीम्या गतीने चौकशी करत असल्याचा आरोप केला आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सीपीआय नेते गुरुदास दासगुप्तांनी केली आहे.

2005 साली झालेल्या कोळसा घोटाळ्यासंदर्भात ओडिशातील ब्लॉक्सबद्दल आदित्य बिर्ला समूह आणि आणि या समुहातील कंपनी हिंडाल्को यांचे प्रतिनिधी असल्याबद्दल कुमार मंगलम बिर्ला यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलं आहे. याचबरोबर कोळसा घोटाळ्याबदद्ल माजी कोळसा सचिव पी सी पारीख यांच्यावरही एफआयआर दाखल झाले आहे.

Leave a Comment