नाशिक जेलमध्ये हाणामारी, कैद्याचा मृत्यू

नाशिक- नाशिकमधील मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी रात्री शिक्षा भोगत असलेल्याा तीन कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक कैदी जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक मध्यवर्ती कारागृहात विशाल चौधरी, विजय इप्पर हे दोघेजण एका खून प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. या कैद्यांची काही दिवसांपूर्वी सुदाम पगार या कैद्याशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर मंगळवारी रात्री आमनेसामने आले. यावेळी त्यांच्याात हाणमारी झाली.

यावेळी पगारने विशाल व विजय या दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत विशालचा जेलमध्येाच मृत्यू झाला. तर विजय हा जखमी झाला आहे. त्यायला उपचरासाठी हॉस्पिटलमध्येा दाखल करण्याेत आले आहे. त्या.च्यायवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी जेल प्रशासनाकडून सुरू आहे.