डोळ्याच्या खोबणीत बसविला दात – मिळाली दृष्टी

लंडन – वैद्यकीय शास्त्रात काय चमत्कार घडतील किंवा घडवले जातील याचा अंदाज सर्वसामान्यांना लावणे अशक्यच असते. असाच प्रकार इयान तिबेटस या कामगाराच्या संदर्भातही घडला आहे. इयानचा डोळा औद्यागिक अपघातात निकामी झाला आणि त्याची दृष्टी गेली. त्यामुळे आपल्या जुळ्या मुलांना पाहण्याची त्याची इच्छा अपुरीच राहणार की काय अशी भीती निर्माण झाली मात्र ख्रिस्तोफर लोऊ या नेत्रतत्राच्या कौशल्यामुळे इयानला आपल्या जुळ्या मुलांचे मुखदर्शन करता आले आहे.

ससेक्स आय हॉस्पिटलमध्ये ही अनोखी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. ऑपर ऑस्टिओ ओडोंटो कस्टोप्रोथेसिस असे भलेमोठे नाव असलेली ही दुर्मिळ शस्त्रक्रिया दोन भागात पार पाडली गेली. प्रथम इयानचा दात जबड्याच्या कांही भागासह काढला गेला. नंतर या दातात ड्रील करून लेन्स बसविले गेले आणि नंतर हा दात डोळ्याच्या खोबणीत बसविला गेला. यामुळे इयानला ४० टक्के दिसू लागले.

इयानचा हा नवा डोळा गुलाबी रंगाचा असून त्याची बाहुली काळ्या रंगाची आहे. बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये या शस्त्रक्रियेची नोंद केली गेली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment