मुंबई- माजी मुख्यामंत्री मनोहर जोशी यांनी आजवर कूटनीती अवलंबून शिवसेनेतील अनेकांना संपविले. त्या तून भाचे असलेले सूधीर जोशींना सुध्दाी सोडले नाही. या काळात त्यांनी जे पेरले होते तेच उगवले आहे. गेली वीस-पंचवीस वर्षे शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा राग खदखदत होता, तो शिवाजी पार्कवर बाहेर पडला, असे मत पूर्वश्रमीचे सेना नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
आतापर्यंत शिवसेनेत सर्वात जास्त पदे जोशी यांनी पदरात पाडून घेतली. सर्व काही मलाच मिळाले पाहिजे, असा त्यांचा अट्टहास होता. सख्ख्या भाच्च्याबद्दल म्हणजेच सुधीर जोशी यांच्या बद़दल सुध्दा त्यांच्या भावना चांगल्या नव्हत्या, असे म्हणत भुजबळ यांनी एक प्रसंग सांगितला. १९७२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तरुण रक्ताला संधी द्यायची म्हणून सुधीर जोशी यांना मुंबईचे महापौर केले. ते पदही मनोहर जोशी यांना हवे होते. आपल्याला टाळून सुधीर जोशींना महापौर केल्याचा एवढा राग त्यांनी धरला की वर्षभर सख्ख्या बहिणीच्या घरीसुद्धा ते गेले नाहीत. अशा माणसाकडून इतरांनी वेगळय़ा काय अपेक्षा करायच्या? असा सवाल भुजबळ यांनी केला.
शिवसेनेत मनोहर जोशी यांनी बाळासाहेब होते तोपर्यंत सर्व पदे मिळविली. हे करीत असताना आपल्या सहका-यांना कायम त्रास देण्याचेच काम त्यांनी केले. त्यांनी विरोधी पक्षाला त्रास देण्यापेक्षा आपल्याच पक्षातील लोकांनाच जास्त त्रास दिला. म्हणूनच गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल कमालीचा राग होता. तो शिवाजी पार्कवर बाहेर पडला, असेही ते म्हणाले.