सोनम झळकणार छोटया पडद्यावर

बॉलीवूडमधील सर्वच मंडळीना गेल्या काही दिवसांपासून छोटय़ा पडद्याचे वेड लागले आहे. त्यामुळेच सर्वजण छोटय़ा पडद्यावर काम करण्यासाठी उत्सु्क आहेत. बॉलीवूडमधील अमिताभ बच्चवन, सलमान खान, माधूरी दीक्षित, शिल्पास शेटी व मल्लिका शेरावतनंतर आता छोटय़ा पडद्यावर काम करण्याचे अभिनेत्री सोनम कपूरने फायनल केले आहे. स्वत:चा फॅशन ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी धडपडणा-या सोनम कपूरनेही आपल्याला छोटय़ा पडद्यावर काम करण्यात रस असल्याचे जाहीर केले आहे.

याआधीही अभिनेत्री सोनमला टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शो करण्याचे प्रस्ताव आले होते, पण तेव्हा सिनमांवर लक्ष केंद्रित केलेल्या सोनमने या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. मात्र ‘रांझना’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या दोन्ही सिनेमाना चांगले यश मिळाल्यावर सोनमची बॉलीवूड कारकीर्द रुळावर आली आहे. आता सिनेमा आणि जाहिरातींबरोबरच आपल्याला आवडणा-या वेगवेगळ्या गोष्टींचे पर्याय धुंडाळायला सोनमने सुरुवात केली आहे.

सोनमला फॅशनबद्दल खूप आवड आहे. शिवाय ती लहान मुलांमध्ये, विशेषत: ती किशोरवयीन मुलामुलींमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुलांशी संबंधित रिअॅलिटी शोचे प्रस्ताव मोठय़ा प्रमाणावर येत आहेत. यातल्या एखाद्या रिअॅलिटी शोची संकल्पना आपल्याला आवडली तर आपण लवकरच छोटय़ा पडद्यावर येण्यास उत्सुक असल्याचे संकेत सोनमने दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती ‘खूबसूरत’ या सिनेमाच्या रिमेकमध्ये बिजी आहे.

Leave a Comment