
मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीज ने २०१३-१४ च्या आर्थिक वर्षातील दुसर्या तिमाहीत व्यवसायाचा १ लाख कोटी रूपयांचा टप्पा पार केला असून ही उलाढाल १४.२ टक्कयांनी वाढून १,०६,५२३ कोटींवर पोहोचली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल करणारी देशातील ही पहिली कंपनी ठरली आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात कंपनीचा नफा १.५ टक्कयांनी वाढला आणि तो ५४९० कोटी रूपयांवर गेला आहे. गतवर्षी हा नफा ५४०९ कोटी रूपये इतका होता.
