मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वोभूमीवर राष्ट्रवादीशी जागावाटपाच्या वादाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. या संदर्भात सोमवारी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये कॉग्रेसने काही पावले माघार घेत आगामी काळात राष्ट्रवादीशी चर्चेची तयारी दर्शवली आहे.
या संदभात झालेल्या बैठकीत निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा झाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी जागावाटपाबाबतही बैठकीत चाचपणी करण्यात आली. राष्ट्रवादीशी जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली. जागांसाठी आग्रह न करता चर्चेतून मार्ग काढण्यासाठी काँग्रसची तयारी आहे.
काँग्रेसने याआधी २६-२२ ऐवजी २९-१९ या नव्या फॉर्मुल्याचा आग्रह धरला होता. मात्र आता निवडणूक समितीचा आग्रह न धरुन दोन्ही पक्षांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्या मुळे कॉग्रेसने आता सामजंस्या ची भूमीका घेतली आहे असे वाटते.