पुणे: अचानक रक्तदाबाचा त्रास होत असल्याेने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्येे अण्णांवर उपचार सुरु आहेत. अण्णांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

अण्णांना प्रोस्ट्रेट ग्रंथीचा त्रास होत असून, त्यावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. अण्णांचा रक्तदाब नियमित करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या त्यांची तब्येत उत्तम असल्याचे त्यांंच्याावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
अण्णंतना गेल्या काही दिवसांपासून प्रोस्ट्रेट ग्रंथीचा त्रास होत असल्यांने त्यांना शस्त्रक्रियेसाठी जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रक्तदाब नियमीत झाल्यालनंतरच ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे.