मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत उतरलेले भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आता एमसीएविरोधात न्यायालयात अपील करणार आहेत. एमसीएमध्ये शरद पवारांना वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय का असा सवाल खासदार मुंडें यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी मुंडे यांनी सुरू केली आहे.
याबाबत बोलताना गोपीनाथ मुंडे म्हीणाले, याप्रकरणी एमसीएमध्ये शरद पवारांना वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय कसा काय यासाठी एमसीएच्या अध्यक्षांकडे तक्रार करणार आहे. तिथ जर न्याय मिळाला नाही तर कोर्टात जाणार आहे. कोर्ट तरी याबाबत योग़य निर्णय घेईल असे वाटते.
काही दिवसांपूर्वी गोपीनाथ मुंडें यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. पण मुंडे मुंबईचे कायमस्वरूपी रहिवासी नसल्याचे कारण देत एमसीए अध्यक्षपदासाठी त्यांनी भरलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. एमसीएच्या घटनेतल्या नियम क्रमांक १७ च्या आधारे हा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. दरम्यािन, हा नियम अधिक सुस्पष्ट होण्याची गरज अनेक कायदेतज्ज्ञांनीही व्यक्त केली आहे.