मुंबई – काही दिवसांपूर्वी मनोहर जोशींनी शिवसेनेच्या नव्या नेतृत्वावर व्यक्त केलेल्या नाराजीचे तीव्र पडसाद आज दसरा मेळाव्यात पाहायला मिळाले. मनोहर जोशींना शिवतीर्थावर पोहोचायला उशीर झाला. तेव्हा शिवसैनिकांनी मनोहर जोशींविरोधात घोषणाबाजी केली.

जोशी व्यासपीठावर पोहोचताच शिवसैनिकांनी त्यांना अर्वाच्य भाषा वापरली. जोशींविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू झाल्यावर मनोहर जोशींवर व्यासपीठ सोडण्याची नामुष्की ओढावली. यावेळी शिवसैनिकांनी मनोहर जोशी हाय…हाय… अशा घोषणा दिल्या.
मनोहर जोशींच्या वक्तव्याने शिवसेनेत फायलिन निर्माण झाले होते. थेट नेतृत्वावर टीका करत पंतांनी स्वत:वरच वादळ ओढवून घेतले. पण या वादळाचा संघटनेवर काहीच परिणाम झाला नाही, उलट शिवसैनिकांच्या रोषालाच पंतांना सामोर जावे लागल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे शेवटी पंतांना माघार घ्यावी लागली.
मनोहर जोशी… शिवसेनेत ज्येष्ठत्व मान्य असलेले हे नेतृत्व सध्या मात्र त्यांच्याच वक्तव्याने वादळात सापडले आणि याला कारण ठरले ते दादरच्या एका कार्यक्रमातील पंताचे वक्तव्य… बाळासाहेबांसारखे नेतृत्व असते, तर एव्हाना स्मारक झाले असते, असे म्हणत मनोहर जोशींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच टीका केली होती. त्याचे पडसाद आज दसरा मेळाव्यात उमटले.