नारायण साईने दिला पोलिसांना चकमा

नवी दिल्ली – दोन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांचा मुलगा नारायण साई राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात होता. मात्र, सुरत पोलिस तेथे पोहोचण्यापूर्वीच तो तेथूनही फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सगळीकडे पथक रवाना झाले आहेत.

आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांचा मुलगा नारायण साई याच्याविरोधात सुरतमधील दोन मुलींनी लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिस नारायण साईचा शोध घेत आहेत. या आधी नारायण साई परदेशी जाऊ नये म्हणून त्याचा शोध घेण्यासाठीची नोटीस जारी केली आहे. गेल्या चार दिवसांपासून नारायण साई फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके स्थापन केली आहेत.

मोबाईल लोकेशन शोध घेवून तो कुठे आहे याचा शोध घेण्या त आला परंतु, मोबाईल बंद असल्यामुळे तो कुठे आहे हे पोलिसांना समजू शकले नाही. त्यानंतर पोलिसांनी नारायण साईच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा नारायण साई गंगनापूर येथे असल्याचे समजल्यावरून पोलिसांनी छापा टाकला परंतु, त्याआधीच नारायण साईने तेथून पळ काढला होता.