सोहाग गाजीचा अनोखा विक्रम

चितगांव – बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्याटतील कसोटी सामन्याकवेळी बांगलादेशचा ऑलराउंडर सोहाग गाजीने अनोखा विक्रम केला आहे. एकाच कसोटीत त्या ने शतक आणि हॅट्ट्रिक करण्याचा विक्रम केला. १३६ वर्षांच्या कसोटीच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा गाजी जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी अशास्व्रूपाची कामगिरी कोणालाच करता आली नाही.

ही पहिली कसोटी अनिर्णीत राहिली. या कसोटीत चार शतके झळकली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४६९ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने ५०१ धावांची खेळी केली. त्यानंतर किंवींनी ७ बाद ५८७ धावांवर दुसरा डाव घोषित केला. यासह न्यूझीलंडने प्रतिस्पर्धी टीमसमोर ४५ षटकांत २५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. बांगलादेशने तीन गडी गमावून १७३ धावांपर्र्यंत मजल मारली.

सोहागने शनिवारी नाबाद १०२ धावा काढल्या. रविवारी त्याने न्यूझीलंडच्या दुस-या डावात सातपैकी सहा विकेट घेतल्या. यामध्ये अँडरसन (८), वाटलिंग (० आणि ब्रेसवेल (०) यांना सलग बाद करून हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने ८५ व्या षटकाच्या दुस-या, तिस-या आणि चौथ्या चेंडूंवर या तिघांना बाद केले.