मुंबई – शिवसेनेच्या 48 व्या दसर्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आक्रमकपणे शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना टिकेचे लक्ष्य केले.

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींबद्दल उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असे उद्गार काढत खिल्ली उडवली होती. याच वक्तव्याचा आज उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. शरद पवार म्हणजे थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग असे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शरद पवार हे नरेंद्र मोदी आणि शिवसेनेवर टीका करताना कल्पकता दाखवतात, मात्र याच कल्पकतेने ते आपल्या दिवट्या पुतण्याला का बोलत नाहीत, असा खडा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. शरद पवार हे कृषीमंत्री असले, तरी त्यांना शेतकर्यांची पर्वा नाही. बैलपोळ्याच्या दिवशीही शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शरद पवारांना शेतकर्यांपेक्षा क्रिकेटचीच जास्त काळजी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. पवारांचे क्रिकेट खेळाडूंबरोबर अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील, मात्र शेतकर्यांसोबत पाहिलेला फोटो तुम्हाला आठवतो का? असा रोखठोक सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना विचारला.