
दातिया – मध्यप्रदेशातील दातिया जिल्ह्यात रतनगढ माता मंदिराबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ८९ जण ठार झालेत तर १०० हून अधिक जण जखमी झालेत. यातील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
दातिया – मध्यप्रदेशातील दातिया जिल्ह्यात रतनगढ माता मंदिराबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ८९ जण ठार झालेत तर १०० हून अधिक जण जखमी झालेत. यातील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
मंडुला देवीचं हे मंदिर असून आज दस-यानिमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक जमा झाले होते. दरम्यान या मंदिराजवळील संध नदिच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली.. त्यामुळे काही भाविकांनी पाण्यात उड्या मारल्या. एका तरुणांच्या टोळीने लवकर दर्शन मिळावं म्हणून पुल तुटायला आल्याची अफवा पसरवल्यानं या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहितीअशी की, मध्य प्रदेशच्या दतिया इथे रतनगड माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत, ८९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक भाविक जखमी आहेत. दसर्याच्या मुहूर्तावर इथे मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. मंदिराकडे जाणार्या पुलावर ही चेंगराचेंगरी झाली. अज्ञाताने सिंध नदीवरील पूल कोसळणार असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे भाविकांनी या पुलावरून पार होण्यासाठी धावपळ केली. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे सिंध नदीत अजून काही जण बुडाल्याची शक्यता आहे.
दरम्यान घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. रतनगड माताच्या दर्शनासाठी सिंध नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. यावेळी अचानक भाविकांमध्ये चेंगराचेंगरी सुरु झाली.
दरम्यान मध्यप्रदेशमध्ये आचारसंहिता सुरु आहे. मात्र मध्यप्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर मृतांच्या नातेवाईकांना दीड लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधीकारी, पोलीस अधिक्षक आणि स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.