दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत अजूनही अनिश्चितता

नवी दिल्लीः भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन व क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे ख्रिस नेनझानी यांची या दौ-यासंदर्भात बैठक झाली. मीडियाच्या प्रश्नांना समोरे जायला नको, म्हणून ही बैठक बीसीसीआयच्या कार्यालयात न घेता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली.

या बैठकीत दौ-याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे बीसीसीआयचे चिटणीस संजय पटेल यांनी सांगितले. सुत्रांच्या माहितीनुसार पटेल व श्रीनिवासन तसेच दक्षिण आफ्रिका बोर्डाचे नेनझानी व नॉर्मन अरेंडस यांनी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-याच्या तारखांवरदेखील चर्चा झाली, पण अजून कार्यक्रम निश्चित झालेला नाही.

या चर्चेनंतर दक्षिण आफ्रिकेचे अधिकारी मायदेशी परतून त्यांच्या बोर्डाच्या अधिका-यांशी चर्चा करतील. त्यानंतर या दौ-याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave a Comment