नागपूर – दसरा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस या निमित्ताने नागपूरमध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उडवली.

नागपूर – दसरा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस या निमित्ताने नागपूरमध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उडवली.
सरकारला लकवा मारला आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारचा समाचार घेतला. केंद्र सरकारची आर्थिक नीती चुकीची आहे. त्यामुळे आर्थिक धोरणात बदल करण्याची गरज भागवत यांनी यांनी व्यक्त केली. देशाला चारी बाजूंनी शत्रूने वेढले आहे. म्हणूनच जनतेने सहयोग करण्याची गरजही असल्याचे ते म्हणाले.