एमसीए निवडणूकीत गोपीनाथ मुंडे रनआउट

मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज बाद ठरल्या ने ते निवडणुकीपूर्वीच रनआउट झाले आहेत. त्या मुळे आता अध्यक्षपदाची माळ केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या गळ्यात बिनविरोध पडणार हे आता स्पष्ट झाले आहे. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अर्ज भरला होता. शनिवारी झालेल्या वैधता चाचणीत मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.

मुंडे यांचा अर्ज मुंबई येथील कायमस्वरुपी वास्तव्याच्या तांत्रिक कारण दाखवित निवडणुक अधिका-यांनी अवैध ठरवला. परंतु ते या निर्णयाविरोधात दाद मागू शकतात अशी माहिती एमसीएचे विद्यमान अध्यक्ष रवी सावंत यांनी दिली. त्यानमुळे आता याप्रकरणी न्याचयायालक काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यामुळे नाराज मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, १९८६ पासून मी मुंबईचा रहिवासी आहे. माझ्या पासपोर्टवर मुंबईचा पत्ता आहे. कर परतावा कागदपत्रांवरही मुंबईचा पत्ता आहे. असे असतानाही माझा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केले.