फायलीन चक्रीवादळाचा जोर वाढला

भूवनेश्वर – फायलीन चक्रीवादळाचे वेग शनिवार सकाळीपासून आणखी वाढला आहे. हे वादळ ओरिसाच्या भोपालपूरपासून ३४५ किलो मीटर दूर आहे. शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे वादळ ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या वादळाचा मुकाबलाकरण्यावसाठी यंत्रणा सज्जा झाली आहे.

दरम्यानन, आगामी काळात येणा-या या वादळाच्या पार्श्वभूमीवर एक लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफच्या २३ टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. ओरिसात एकाही नागरिकाचा जीव जाऊ देणार नाही असे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटले आहे.

फायलिन चक्रीवादळामुळे ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वा-यामुळे समुद्र खवळेला असेल त्यामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना तातडीने किना-यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या हे चक्रीवादळ पश्चिमोत्तर दिशेने पुढे जात असून, हे वादळ ओरिसातील पारादीपपासून ८५० किलोमीटरवर केंद्रीत आहे. शनिवारी रात्रीपर्यंत हे वादळ ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.