चारा डेपो भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत

मुंबई – चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव तुरुंगात गेले आहेत. आता राज्यातही चारा घोटाळा गाजण्याची शक्यता आहे. कारण चारा घोटाळ्यातील तपासाच्या कार्यपध्दतीवर औरंगाबाद खंडपीठाने कडक ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता विधानपरिषद विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळात शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सरकारने चारा छावण्या उभारल्या होत्या. पण या चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घोटाळ्याला जबाबदार असणा-यांवर महिनाभरात गुन्हे दाखल करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील चारा घोटाळ्यावरील याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले. याचाच आधार घेत सरकारने सातारा, सांगली, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यातल्या चारा घोटाळ्याचीही चौकशी करण्याची मागणी विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.

 

 

Leave a Comment