सॅमसंगचा नवा कर्व्ह्ड डिस्प्ले ‘गॅलॅक्सी राऊंड’ फोन बाजारात

सेऊल- मोबाईल फोनच्या बाजारात सॅमसंगने नवा धमाल फोन बुधवारी लॉन्च केला आहे. सॅमसंगने लॉन्च केलेल्या गॅलॅक्सी नोट’सोबतच आणखी एक स्मार्ट कर्व्ह्ड डिस्प्ले’ फोन ज्याची स्क्रीन फ्लेक्सिबल आहे असा फोन बाजारात आणला आहे. काल कोरियात याचे लॉन्चिंग करण्यात आले आहे.  होम स्क्रिन बंद असतानाही मिस कॉल आणि बॅटरी लाईफ पाहण्याची सोय या नव्या फोनमध्ये आहे. वळणदार आकारामुळे फोन हातात धरताना चांगली ग्रिप मिळेल. व्हिडिओ पाहतानाही वेगळा अँगल मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. एलजी’ने पुढील वर्षी आपल्या वळणदार फोनचे उत्पादन सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी सॅमसंग’नं हा फोन सादर केला. एलजी’ला शह देण्यासाठी सॅमसंग’नं हे पाऊल उचलले आहे. मात्र, सध्या सादर करण्यात आलेला हा नवा फोन प्रतिकात्मक आहे. सॅमसंग’कडे या फोनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गॅलॅक्सी राऊंड’ डिस्प्ले हा  5.7 इंच जाडी,  7.9 मिमी वजन जे की गॅलॅक्सी नोट पेक्षाही कमी आहे.  154 ग्रॅम बॅटरी, 2800 एमएएच कॅमेरा,  13 एमपी ओएस: अ‍ॅन्ड्रॉईड 4.3, सॅमसंगचा हा मोबाईल यपोन दक्षिण कोरियातल्या सगळ्यात मोठ्या मोबाईल स्टोअर्सजवळ आहे. या फोनची किंमत 1.089 मिलियन वॉन (जवळपास 1000 डॉलर) इतकी आहे.

 

 

Leave a Comment