रामदास आठवलेंची झेड सुरक्षा काढली

मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची झेड सुरक्षा आता शिथिल करण्यात आली आहे. आठवले यांना पूर्वी झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. आता मात्र त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षेखालील समितीने घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था काढण्यात आल्याने आठवले मात्र नाराज झाले आहेत.

याबाबत बोलतांना आठवले म्हणाले ‘ शरद पवार यांची साथ सोडली म्हणून आपली झेड सुरक्षा काढून घेण्यात आली. असा आरोप त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांवर केला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. राज ठाकरे यांना यापूर्वी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढते दौरे आणि सभा लक्षात घेऊन सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. राज ठाकरे यांनी याआधी आपली सुरक्षा व्यवस्था स्वत:हून सरकारला परत केली होती.

Leave a Comment