टी-२०च्या ऑस्ट्रेलिया-भारत सामन्यावर पावसाचे सावट

राजकोट – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या एकमेव टी-२० सामना गुरूवारी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होत आहे. या लढतीवर पावसाचे सावट आहे. गेल्या तीन दिवसांपासून राजकोट येथे जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, बुधवारी असाच पाऊस पडल्यास टी -२० सामन्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे आगामी काळात पर्जन्यवृष्टी होवू नये अशीच प्रार्थना सर्वांना करावी लागणार असे दिसते.

सामन्याचे संयोजक मात्र सामन्यासाठी जय्यत तयारी करीत आहेत. सामन्याच्या दिवशी पाऊस पडला , तरी सामना उशिराने का होईना खेळवला जाईल , अशी त्यांना खात्री वाटते. स्टेडियमवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी ड्रेनेजची उत्तम व्यवस्था असल्याचे सांगण्यात येते. त्या.मुळे जरी सामन्याच्या दिवशीपण पावसाने हजेरी लावली तर काही तासातच मैदान सुरळीत करण्या साठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत.

२८ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या स्टेडियमवर गुर्जर बंधूभगिनी गरब्यात न रमता त्यांचा लाडला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाचा खेळ बघण्यासाठी हजेरी लावतील , असा विश्वास संयोजकांना वाटतो. त्यादमुळे आगामी काळात पर्जन्यवृष्टी होवू नये अशीच प्रार्थना सर्वांना करावी लागणार असे दिसते.

Leave a Comment