थॅलॅसीमिया : विवाहपूर्व चाचणी आवश्यक

मानवाने आरोग्याच्या क्षेत्रात कितीही संशोधन केले तरी काही नवे नवे विकार त्याचा पिच्छा पुरवत आहेत. गेल्या २० वर्षात पुढे आलेेला असाच आपला पिच्छा पुरवणारा विकार म्हणजे थॅलॅसीमिया. या विकाराचे वैशिष्ट्य असे की तो अनुवांशिक आहे. आई किंवा वडील यातल्या कोणा एकाला तो असेल तो मुलांना होण्याची शक्यता मोठी असतेच पण आई आणि वडील या दोघांनाही थॅलॅसीमिया असेल तर तो मुलांना हमखास होतो. तो वयाच्या दोन वर्षाच्या आतच दिसून येतो. तो होणार्‍या मुलाला जाणवत नाही पण थोडे काम केले तरीही गळून गेल्यागत होणे हे त्याचे मुख्य लक्षण असते.

वय वाढल्यानंतर या विकाराची जाणीव होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले की तो वाढतो आणि अशा लोकांच्या पोटी येणार्‍या दांपत्यांनाही हा विकास जडतो. अनुवांशिकते मुळे होणार्‍या आजारात हा आजार मोठा समजला जातो. या विकारात हिमोग्लोबीनची निर्मिती बाधित होत असते. हिमोग्लोबीन हा रक्ताचा किमी महत्त्वाचा घटक आहे हे सर्वांना माहीतच आहे. हिमोग्लोबीन श्‍वसनातून शरीरात घेतला जाणारा प्राणवायू शरीराच्या विविध अवयवांना पुरवत असतो. पण थॅलॅसीमिया झाला की हिमोग्लोबीनची निर्मिती होत नाही आणि विविध अवयवांना प्राणवायूच मिळत नाही. परिणामत: त्या अवयवात कार्यक्षमता टिकत नाही.

या विकारावर इलाज काय ? त्यावर पहिला आणि सर्वात शेवटचा इलाज म्हणजे पेशंटला ठराविक काळाने नवे रक्त पुरवणे. अनेक रक्तपेढ्यांत अशा मुलांची नोंद असते आणि त्यांना जगवण्यासाठी स्वेच्छेने ठराविक काळाने रक्तदान करणारे रक्तदातेही असतात. हा तर त्या मुलांना जगवण्याचा मार्ग झाला पण मुळात हा विकार होऊ नये यासाठी काय करावे याचा अजून तरी काही उपाय सापडलेला नाही. मात्र थॅलॅसीमिया होणारी मुले जन्माला न घालणे हा सर्वात प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी विवाह करणारांनी विवाहाआधी वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे. यातल्या दोघांनाही हा विकार असेल तर त्यांचा विवाह अजीबात करता कामा नये.

जगात सौदी अरबस्तानात या विकाराचे प्रमाण ङ्गार आहे. १९ टक्के लोक बाधित आहेत. त्यामुळे तिथे विवाहाच्या आधी वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे आहे. डॉक्टरांनी हिरवा बावटा दाखवला तरच विवाह करता येतो.