सोनाक्षीचा `बिकीनी`ला ‘देसी’ पर्याय…

स्वीमिंग पूलची पार्श्वभूमी असलेले चित्रीकरण स्थळ, त्यामुळे या ठिकाणी युनिटमधील फक्त काम असलेल्यांनाच प्रवेश! बाकी सर्व युनिट चित्रीकरण स्थळाबाहेर! संपूर्ण उपस्थितांचे डोळे स्वीमिंग पूलमधून बाहेर येणाऱ्या नायिकेकडे खिळलेले. नेहमीप्रमाणे बिकीनीत किंवा स्वीमसूटमध्ये एखादी ललना दिसेल अशी अपेक्षा. पण, प्रत्यक्षात घडत ते अनपेक्षित!

स्वीमिंग पूलमधून बाहेर येते साडीतली `दबंग` अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा. निर्मात्यांना सोनाक्षीने बिकीनीऐवजी साडीवर समाधान माना, असं ठणकावून सांगितंल आहे. `आर. राजकुमार` या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा नायिकेच्या भूमिकेत आहे. शाहीद कपूर नायक असलेल्या या चित्रपटात सोनाक्षीची भूमिका फारच राऊडी आहे. त्यामुळे, या भूमिकेला अनुसरून आणि चित्रपटातील प्रसंगानुरूप वरील वर्णन केलेलं स्वीमिंग पूलचे दृश्याचं चित्रण झालं आहे. पण, सोनाक्षी बिकीनीऐवजी साडीवर स्वीमिंग पूलमधून बाहेर येते असं.

चित्रपटातील सोनाक्षीची व्यक्तिरेखाच जर बोल्ड आहे तर तिने या प्रसंगात साडी ऐवजी बिकीनी घालायला हवी होती, असा अनेकांनी तिला समजावंल. अगदी तिच्याबरोबरच्या आणि तिच्या नंतर इंडस्ट्रीत येणाऱ्या सगळ्याच अभिनेत्री प्रत्येक चित्रपटात बिनधास्त बिकीनी सीन देत असताना फक्त सोनाक्षीनेच कांगावा का करावा, असा प्रश्न सगळयाच पडतो आहे.यापुढेही आपल्या भूमिकेत काही बदल होणार नसल्याचे सोनाक्षीनं स्पष्ट केलं आहे.

सोनाक्षीला बिकीनी घालण्यात काही अडचणी आहेत का?, या प्रश्नावरही स्पष्ट उत्तर न देता `मी चित्रपटात एकदम राऊडी भूमिका केली आहे. प्रभुदेवाचा चित्रपट असल्याने नृत्य आणि मस्ती असा धम्माल पट आहे त्यामुळे आधी कधीही केला नव्हता असा बोल्ड चित्रपट मी केला आहे`, अशी गुगली तिनं टाकली आहे. पण, बिकीनी घालण्याला मात्र आपला ठाम नकार असेल, हेही तिने स्पष्ट केलं. बिकीनीच्या ऐवजी मी साडीतच दृश्य देणार.

Leave a Comment