बॉलीवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि हॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे सिनेमे पुढील वर्षी जानेवारी माहिन्यात आमने-सामने येत आहेत. त्यामुळे दोघीचेपण पुनरागमनाचे सिनेमे एकाच दिवशी येत असल्याने कोणाचा सिनेमा हिट ठरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्योगपती राज कुंदरा सोबत जानेवारी २००९ साली शिल्पाने विवाह केला. विवाह झाल्यांनतर शिल्पा शेट्टीने सिनेमात काम करणे बंद केले होते. २०१० साली प्रदर्शित झालेल्य ‘द डिजायर’ या सिनेमात शिल्पा शेवटच्या वेळा दिसली होती. त्यांनतर शिल्पा शेट्टीने तिच्या होम प्रोडकशनची स्थापना केली, तिच्या या होम प्रोडकशनचा ‘ढ़िशकियांऊ’ हा सिनेमा आगामी काळात येत आहे.
शिल्पाच्या या सिनेमात सन्नी देओल आणि हरमन बावेजा यांची मुख्य भूमिका असणार आहे. हा तिचा सिनेमा १० जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. त्याच दिवशी बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितची मुख्य भूमिका असलेला ‘डेढ़ इश्किया’ हा सिनेमा रिलीज होत आहे. यामध्ये माधुरीशिवाय अभिनेता नसरुद्दीन शहाने काम केले आहे. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.