जॉन अब्राहमसाठी तीन कोटीचे गाणे

गेल्या काही दिवसांपासून व्यस्त असलेला बॉलीवुडचा माचोमैन जॉन अब्राहम येत्या काळात ‘वेलकम बैक’ या सिनेमातून एन्ट्री करणार आहे. जॉनच्याच या धमाकेदार एन्ट्रीसाठी तीन कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यासाठी तीन कोटीचे गाणे तयार करण्या्त आलेआहे.

‘वेलकम बैक’ या सिनेमाचा निर्माता फिरोज नाडियाडवाला, दिग़दर्शक अनीस बज्मी हे गाणे वेगया पघ्दतीने साजरे करण्यात यावे यासाठी प्रयत्नशील आहेत. या गाण्यासाठी संगीतकार अनु मल्लिक आणि अनीस भाईने खूप मेहनत घेतली आहे.

याबाबत बोलताना निर्माता फिरोज नाडियाडवाला म्हाणाला, ‘आगामी काळात हे गाणे विशेष पध्दतीने शूट करण्यात आले आहे. या गाण्यात ७०० ज्यू नियर कलाकार आणि डांसर्स सहभागी होणार आहेत. या गाण्याची शुटिंग सात दिवस चालणार आहे. जॉनवर आधारित असलेल्या या गाण्यासाठी तीन कोटी खर्च करण्यात येणार आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच जॉन अब्राहमची एंट्री होणार आहे.’

‘वेलकम बैक’ हा सिनेमा अनीस बज्मी दिग़दर्शी ‘वेलकम’ या सिनेमाचा सीक्वल आहे. ‘वेलकम’ मध्ये अक्षय कुमार, कैटरीना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर, फीरोज खान आणि परेश रावलने मुख्यी रोल केला होता. ‘वेलकम बैक’ मध्ये अक्षय कुमारची भूमिका जॉन अब्राहम करीत आहे. त्या‍सोबत अभिनेत्री कैटरीना कैफ व श्रुति हासन मुख्य भूमीका करीत आहे.