सचिन-राहूलचा २० ट्वेण्टीला बाय-बाय

नवी दिल्ली: क्रिकेट जगतातील दोन दिग्गज म्ह्णजेच सचिन तेंडूलकर आणि राहूल द्रवीड यांनी ट्वेण्टी ट्वेण्टी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेटचे हे दोन दिग्गज आहेत, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द वॉल राहुल द्रविड यांचे संघ चॅम्पीन्स लीगच्या फायनलसाठी आमने-सामने आले होते. टी ट्वेण्टीचा कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सामना जिंकून सचिनला निरोप दिला.

यावेळी दोघांनी एकमेकांच्या असामान्य कर्तृत्वाची तोंडभरून स्तुती केली. माझ्या प्रत्येक टीममध्ये राहुल द्रविडला नेहमीच स्थान असेल. त्याने गाजवलेल्या तिस-या क्रमांकाची जागा त्याच्यासाठी असेल, असे गौरोवोद्गार तेंडुलकरने काढले.तर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या तेंडुलकरवर द्रविडनेही स्तुतीसुमने उधळली. तेंडुलकर नेहमीच माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत असेल, असे द्रविड म्हणाला.

पुढे बोलताना तेंडुलकर म्हणाला, ‘द्रविडसोबत मी १९९५ मध्ये चॅलेंजर ट्रॉफीत खेळलो होतो. त्यावेळी मी टीमचा कर्णधार होतो. द्रविडचे फलंदाजीतील कौशल्य आणि टेक्निक इतके उत्तम आहे, की तुम्ही त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. माझ्या कोणत्याही टीममध्ये द्रविडला तीन नंबरवर स्थान असेल.’ यानंतर द्रविडनेही तेंडुलकरबाबत आठवण सांगितली. ‘मी तेंडुलकरपेक्षा वयाने दोन महिन्यांनी मोठा आहे. मात्र क्रिकेटमध्ये तो माझ्यापेक्षा सात वर्ष सीनिअर आहे. मी नेहमीच त्याला माझे प्रेरणास्त्रोत मानतो’. सचिन – द्रविडने न्यूझीलंडविरुद्ध आठ नोव्हेंबर १९९९ रोजी हैदराबादमध्ये दुस-या विकेटसाठी तब्बल ३३१ धावांची भागीदारी रचली होती.

Leave a Comment