चेहर्‍यावरचे काळे डाग कसे घालवावेत याचे उपाय

उन्हामध्ये ङ्गिरल्याने चेहरा काळा पडतो आणि चेहर्‍यावर काही विशिष्ट ठिकाणी विशेषत: उंचवट्याच्या ठिकाणी जास्त गडद काळे डाग पडतात. असे डाग घालविण्यासाठी घरगुती उपाय खूप उपयुक्त पडतात. आपल्या परंपरेने आपल्याला चेहरा आणि त्वचेच्या आरोग्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगितलेले आहेत. त्यांचा वापर केल्यास चेहरा तजेलदार आणि डागविरहित होतो. त्यामध्ये प्रामुख्याने काकडी, मध, लिंबाचा रस, हळद, ताक, नारळाचे पाणी, बदाम यांचा वापर प्रामुख्याने केला जात असतो.

हळद आणि चंदन यांच्या वापराबाबत तर लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. साखर ही औषधी असू शकेल यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही. पण प्रत्यक्षात साखर ही चेहरा स्वच्छ धुण्यास उपयोगी पडते. तीच गोष्ट ताकाची. ताकामुळे चेहर्‍याची तकाकी वाढते. त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरावयाच्या वरील गोष्टींचा वापर करूनच चेहर्‍याला लावण्याकरिता विविध प्रकारचे लेप तयार करावे लागतात. त्यामध्ये सर्वाधिक उपयुक्त ठरणारा लेप म्हणजे काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणारा लेप. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा चेहर्‍यावर लावावे, नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. या मिश्रणात थोडा लिंबाचा रस सुद्धा मिसळावा.

लिंबाच्या रसाने चेहर्‍याची कातडी निरोगी होते. त्याचबरोबर काकडी आणि गुलाब पाण्याचा उपयोग चेहर्‍याच्या त्वचेला थंडाई पोचविण्यास कारणीभूत ठरतात. मध आणि लिंबाचा रस यांचेही मिश्रण उपयुक्त ठरते. दोन चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहर्‍यावरच्या गडद काळ्या डागांवर लावावा. काही मिनिटे हा थर चेहर्‍यावर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा तजेलदार होतो. हळद ही पूर्वपरंपरेने त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरली जात असते. तेव्हा थोडीशी हळद घेऊन तिच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकावा आणि कच्चे दूध मिसळून त्यांची पेस्ट तयार करावी. हा थर चेहर्‍यावर वाळेपर्यंत ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवावा.

लिंबाचा रस हा नुसता वापरला तरी चालतो. विशेषत: आपल्या शरीराचे घोटे, कोपरे आणि गुडघे अधिक काळे पडत असतात. त्यांना लिंबाचा रस चोळावा आणि पंधरा मिनिटानंतर ते भाग पाण्याने धुवून टाकावे. तिथली त्वचा सामान्य होते. एकंदरीत हे सगळे पदार्थ त्वचेला तजेला देण्यास उपयुक्त ठरतात.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

47 thoughts on “चेहर्‍यावरचे काळे डाग कसे घालवावेत याचे उपाय”

 1. माझ्या चेहर्‍यावर वांगााचे डाग आहेत. त्यासाठी घरगुती उपाय सांगा

 2. वांगाचे डाग कसे घालवाल ?
  माझ्या nakawar & गालावर दोन्ही बाजूला वांगाचे काळे ड़ाग आलेत काय करु उपाय सांगा ??

 3. माज्या गालावर आनी नाकावर वांगआचे काले डाग आहेत तर काय करु प्लीज सान्गा

 4. नाका वर वांग चे डाग पडलेले आहे तर काय करावे?

 5. Good morning sir. Sir maazi patni laa waang aahe. Now she is 30 years old. First pregnancy (2008)nantar tila haa traas aahe. Last 5 years pasun aahe. Pls suggest any ayurvedic or home products.

 6. माझ्या तोंडावर तीळ आहेत खुप ते कसे घालवता येतील plz गाईडन्स

 7. ललित पवार

  सर माझ्या चेहऱ्यावर कांजनिचे काळे आणि खोलवर डाग आहेत उपाय सांगा

 8. ललित पवार

  सर माझ्या चेहऱ्यावर कांजनीचे काळे आणि खोलवर डाग आहेत कृपया उपाय सांग सर प्लीज़

 9. चेहर्यावरील काळे डाग घालविण्यासाठी उपाय

 10. निलम आवटे

  माझ्या चेहर्‍यावर वांगााचे डाग आहेत. त्यासाठी घरगुती उपाय सांगा.

 11. माझ्या चेहऱ्यावर टाक्याचे डाग पडले ते कसे घालवावे ते सांगा

 12. Kanchan K,Salgoankar

  माझ्या चेहऱ्यावर वांगा चे डाग आहेत कृपया मला आयुर्वेदीय उपाय सुचवा

 13. Kanchan K,Salgoankar

  माझ्या चेहऱ्यावर मस आहेत यावर कृपया आयुर्वेदीय उपाय सांगावा.

 14. माझ्या चेहऱ्यावर गालावर गडद असा काला डाग् पडला आहे बरिच उपचार केले पण तो ज़ात नाही काही तरी ठोस उपचार सांगा

 15. pawar mahendra eknath

  नाका वर वांग चे डाग पडलेले आहे तर काय करावे?

  .

 16. नाका वर वांग चे डाग पडलेले आहे तर काय करावे?

 17. वांगाचे डाग कसे घालवाल ?

  माझ्या गालावर दोन्ही बाजूला वांगाचे काळे ड़ाग आलेत काय करु उपाय सांगा ??

  राजन…..

 18. विलास तावरे

  माझ्य कपाळावर काळे पट्टे आले आहे तरी उपाय सांगावा सर

 19. माझ्या तोंडावर लय फोड्या आल्या काय करु सर सांगा

 20. Hi sir,

  mzya chehryavar pahile khup modya hote pan ti modi me swataha phodaycho tase karta karta jite nakachya ajubajula khup khade padle ahet tar please tyachya var kahi upay sanga.

  Regards.
  sagar.

 21. sir majya tondavar pimpleche kale dag padale ahet mi kay karu collage madhe sarve majhi majak udavatat

 22. विदेश पाटील

  Sir mazya tondavr kale til vadht chalale ahet ..plz sir yavr upay sangava

 23. विदेश पाटील

  Sir mazya tondave kale til vadhatch chalale ahet….plz sir yavr upay sangava

 24. विदेश पाटील

  Sir mazya Cheharyavr kale til vadhat chalale ahet,..plz sir yavar upay sangava…..

 25. किरण चौधरी

  नाका वर वांग चे डाग पडलेले आहे तर काय करावे?

 26. नमस्कार सर माझ्या दोन्ही डोळ्यांच्या बाजुने काळे डाग पडले आहेत…

  सर मला याच्यावर उपाय सांगा

  plz….

 27. सर माझ्या डोळ्यान खाली काळे डाग आहे. आणि चेहर्यावर सुरकुत्या आहे तर त्या साठी काही उपाय सांगा ना….
  धन्यवाद

 28. सचिन काटे

  गालावर दोन्ही बाजूला काळे ड़ाग आलेत काय करु सांगा

 29. माझ्या चेहऱ्यावर काळे टीपके असे डाग पडले आहेत आणि ते वाढत आहेत मी काय करू सर.

 30. RahulRahul Makeshwar

  Sir mazya face vr vang ahe tyache kale daag ahet tr tya sathi konti oushad vaparu…..please

 31. आड़े युवराज

  sir l comes dark spot on my skin because of pimple so please treat and what will i use

 32. सचिन आनंदे

  सर माझ्या कपाळावर काळा चट्टा पाडला आहे तर मी यासाठी काय करावे

Leave a Comment