लग्न इथे टिकते

संगीत दिग्दर्शक म्हणुन कारकिर्दीची सुरूवात, नंतर सतरंगी या चित्रपटाची निर्मिती आणि आताअजय नाईकने ’लग्न पहावे करुन’ या रोमँटिक धाटणीचा चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे. त्याच्या शीर्षकावरुनच हा चित्रपट लग्नसंस्थेवर आधारित आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

विवाह संस्थेला आपल्याकडे वेगळे पावित्र्य आहे! आजच्या तरुण पिढीची मानसिकता लक्षात घेता लग्न जुळवणे आणि टिकवणे, हे मोठे आव्हान आहे, कारण आजच्या धकाधकीच्या आणि ताण-तणावपूर्ण आयुष्यात एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे कठीण होत चालले आहे! या सगळ्याचा विचार करून दोन तरूण एक वधू-वर सूचक मंडळ सुरू करतात. पारंपरिक विवाह जुळवण्याच्या पद्धतीला ते आधुनिक विचारांची जोड देतात, जेणेकरून लग्न नुसतीच
जुळवण्यापलिकडे जाऊन, लग्न टिकवण्यासाठी लागणार्‍या सर्व बाबींचा विचार केला जाईल! हे सर्व करत असताना त्यांची होणारी तारेवरची कसरत एका तरल अशा लव्हस्टोरीतून प्रेक्षकांना बघायला मिळते.

लग्न पहावे करून ही दोन कपल्सची कथा आहे. अदिती टिळक (मुक्ता बर्वे) आणि निशांत बर्वे (उमेश कामत) यांची एकदा अचानक भेट होते, त्या भेटटीचे रूपंतर मैत्रीत आनि नंतर प्रेमात होते. तत्पुर्वी निशांतचे लग्न त्याची अमेरिकेतील नोक्कीरी गेली म्हणु मोडलेले आहे तर घरात भविष्यालची परंपरा असली तरी लग्न जुळविण्ण्याीसाठठठी जन्मपत्रीकेची नव्हे तर दोघांनी एकमेकांना समजुन घेण्ण्याची गरज अधिक आहे यामुळे पत्रीकेशिवाय लग्न जुळणे महत्त्वाचे असे आदितीला वाटते. आणि त्यातुनच ते दोघे एक मॅरेज ब्युरो सुरु करतात. त्यांच्या मॅरेज ब्युरोचे नाव ’शुभविवाह’ आहे. लव्ह मॅरेज नव्हे तर अरेंज मॅरेज जुळवून ते लग्न शेवटपर्यंत कसे टिकेल यावर त्यांचा भर असतो. यासाठी हे दोघेही ’सायंटिफिक मॅरेज मेकिंग’ ही नवीन संकल्पना अमलात आणतात. अदिती आणि निशांतच्या मॅरेज ब्युरोत जुळलेले पहिले लग्न म्हणजे राहुल (सिद्धाथ र्चांदेकर) आणि आनंदीचे (तेजश्री प्रधान) मात्र राहुल आणि नंदिनीचे लग्न फार काळ टिकणार नाही, असे शहरातील एक प्रसिद्ध ज्योतिषी अदिती आणि निशांतला सांगतात. त्यामुळे राहुल आणि नंदिनीचे लग्न टिकवण्याचे मोठे चॅलेंज राहुल आणि अदितीसमोर उभे राहते. आता राहुल आणि नंदिनीचे लग्न टिकणार का ? अदिती आणि निशांत त्यांच्या उद्देश पूर्ण करु शकतील का ? या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी हा चित्रपट पहायलाच हवा.

अजय नाईकचा दिग्दर्शक म्हणुन हा पहिलाच चित्रपट असला तरी त्याचा नवखेपणा कुठेही जाणवत नाही. कथेची नेमकी मांडणी करत तीचे उत्तम सादरीकरण करण्यात अजयला यश मिळाले आहे. मुक्ता, उमेश, सिद्धार्थ, तेजश्री आणि स्वाती चिटणीस यांनी अजयचा विश्‍वास साथ ठर्रवत आपल्या अभिनयाचे शंभर टक्के योगदान दिले आहे. दिग्दर्शना बरोबरच संगीताची बाजुही सार्थपणे अजयने पेलली आहे. लव्हस्टोरीला एक प्रश लुक असल्याने प्रेक्षक कथेशी शेवटपर्यंत बांधुन रातो. लग्न टिकविण्याची ही गोष्ट एकदा अनुभवायलाच हवी.

चित्रपट – लग्न पहावे करुन
निर्मिती – स्प्रिंट आर्ट्स क्रिएशन आणि सोलॅरिझ इंटरनॅशनल
कथा, दिग्दर्शन आणि संगीत – अजय नाईक
पटकथा आणि संवाद – क्षितीज पटवर्धन, समिर विध्वंस
कलाकार – मुक्ता बर्वे, उमेश कामत, तेजश्री प्रधान, सिद्धार्थ चांदेकर, स्वाती चिटणीस, जयंत सावरकर.

रेटिंग – * * *

Leave a Comment