मुंबई: अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण तिच्या आत्महत्येनंतर हाती लागलेल्या काही फोटोंवरुन हा प्रश्न निर्माण झाला आहे. या फोटोंमध्ये जिया खानच्या हातावर आणि चेह-यावर जखमांचे व्रण दिसत आहेत. त्यामुळे जिया खानची आई राबिया खान यांनी हे फोटो पुराव्यासाठी कोर्टात सादर केले आहेत. त्यामुळे अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्याचे गूढ कायम आहे.
आत्म्हत्येनंतर अभिनेत्री जिया खानचे शवविच्छेदन योग्य पद्धतीने झाले नसल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे. जियाने ३ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. जुहूमधील सागर संगीत नावाच्या इमारतीतील फ्लॅटमध्ये ओढणीला लटकलेल्या अवस्थेत जियाचा मृतदेह मिळाला. नि:शब्द, गजनी या सिनेमात तिने अभिनय केला होता. ‘हाऊसफूल’ हा तिचा अखेरचा सिनेमा होता.
पोलिसांनी या प्रकरणी आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. त्या प्रकरणाची सुनावणी आता कोर्टात सुरू असुन जियाच्या आईने कोर्टात दाखविलेल्या काही फोटोमुळे पुन्हात एकदा जियाने आत्मयहत्या केली की तिचा खून करण्यात आला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.