पॅरिस- भारत 2050 मध्ये चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. फ्रेंच इन्स्टिटयूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज या संस्थेने जागतिक लोकसंख्येबाबत अभ्यास केला आहे.

पॅरिस- भारत 2050 मध्ये चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. फ्रेंच इन्स्टिटयूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज या संस्थेने जागतिक लोकसंख्येबाबत अभ्यास केला आहे.
येत्या 2050 मध्ये भारताची लोकसंख्या वाढून एक अब्ज 60 कोटी होणार असून लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचणार आहे. तर चीनमध्ये लोकसंख्या एक अब्ज 30 कोटी होऊन दुस-या क्रमांकावर येईल. 2050 मध्ये जागतिक लोकसंख्या वाढून नऊ अब्ज 70 कोटी एवढी होणार आहे.
सध्या एक अब्ज 30 कोटी एवढी लोकसंख्या असलेला चीन हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. पाठोपाठ दुसरा क्रमांक घेत भारताची लोकसंख्या एक अब्ज 20 कोटी एवढी आहे. आयएनईडी या संस्थेने जूनमध्ये हा अभ्यास केला असून हा अहवाल जागतिक बँक व संयुक्त राष्ट्र संघ यांना सादर केला आहे.