पुणे, – राज्यात रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व हरभरा पिकांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना पथदर्शक स्वरूपात प्रथमच राबविण्यात येणार आहे. तापमानातील बदल, आर्द्रता, अवेळी पाऊस अशा विविध हवामान घटकापासून होणार्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत ज्वारी, गहू, हरभरा पिकांसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये प्रति हेक्टरी मर्यादेपर्यंत विमा संरक्षण देण्यात येणार असून, राज्यात भारतीयकृषि विमा कंपनीमार्फत ही योजना कार्यान्वित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
गहू, ज्वारी, हरभरा पिकांसाठी विमा योजना
राष्ट्रीयकृषि विमा योजना रब्बी हंगाम 2013-14 मध्ये गहू (जिरायत), ज्वारी (बागायत व जिरायत) हरभरा या पिकांसाठी 80 टक्के या उच्च जोखीमस्तरावर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्यांना वाढीव विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे. या योजनेत सहभागी होणारे शेतकरी 1.5 ते 2 टक्के या मर्यादित दराने विमा हप्ता भरणार आहेत. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांसाठी विमा हप्त्यात केंद्र शासनाकडून 5 टक्के अनुदान देयअसून, राज्यातील सर्व शेतकर्यांसाठी राज्यशासनामार्’त वाढीव हप्ता अनुदान देण्यात येणार आहे.
राष्ट्रीयकृषि विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रासाठी गारपीट, पूर, चक‘ीवादळ, भूस्खलन या स्थानिक आपत्तींमुळे होणार्या नुकसानीचे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून भारतीयकृषी विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे.
