मोबाईलवर भूकंपाचा इशारा मिळेल

न्यूयॉर्क – काही स्मार्ट फोन्स् आणि लॅपटॉपमध्ये काही विशिष्ट प्रकारचे सेन्सर्स विलक्षण कार्यक्षम ठरले असून त्यातले काही सेन्सर्स भूकंपाच्या धक्क्याची पूर्वसूचना देण्याच्या क्षमतेचे असल्याचे आढळून आले आहे. तूर्तास उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पाच रिश्‍चर स्केल किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप होणार असेल तर त्याची पूर्वसूचना मिळू शकते, असे एका नव्या अभ्यासात निष्पन्न झाले आहे.

भूकंपप्रवण क्षेत्रातील किंवा अधिक धोकादायक ठरू पाहणार्‍या परिसरातील काही लॅपटॉपमध्ये आणि स्मार्ट फोनमध्ये थोडेसे बदल केले आणि काही नवीन चिप्स् बसवल्या की तर हे काम होऊ शकेल असे या प्रयोगावर काम करणार्‍या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

इटलीतील काही शास्त्रज्ञांनी या संबंधात काही प्रयोग केलेले आहेत. ऍन्टोनिनो डी अलसँड्रो आणि ग्यूसेफ डी ऍना यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांनी काही प्रयोग सुद्धा केले आहेत आणि काही नव्या चिप्स् भूकंपाची सूचना देणार्‍या ठरू शकतात असे त्यांना या प्रयोगात दिसून आले आहे.

Leave a Comment